ढाका : येथे सुरू असलेल्या 2021 आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू ज्योती सुरेखा व्हेनामने कोरियाच्या माजी विश्वविजेत्या युहेयुनचा पराभव करत महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम फेरीत भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामने कोरियाच्या युहेयुनचा 146-145 अशा गुणांनी निसटता पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत महिलांच्या मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा व्हेनाम यांनी रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या युनही आणि याँगची यांनी भारताच्या यादव आणि व्हेनाम यांचा 155-154 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे.