ऑनलाईन टीम / मुंबई :
महत्त्वाच्या तारखा, दिनविशेष, अनेक दिग्गज, त्यांचे योगदाना सलाम करण्यासाठी गुगलकडून नेहमीच रंगीबेरंगी डूडल तयार केले जाते. त्याप्रमाणे आज भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी एक खास डूडलच्या तयार केले आहे.
आजच्या या खास डूडलवर भारतातील कला आणि संगीत यांना स्थान दिले आहे. यामध्ये तुतारी, सनई, ढोल, वीणा, बासरी आणि सारंगी ही वाद्ये दाखवली आहेत. हे खास डूडल मुंबईतील एक कलाकार सचिन घेरकर यांनी तयार केले आहे.
गुगलने डूडलमध्ये या वाद्यांद्वारे भारतीय संगीताची प्राचीन आणि समृद्ध परंपरा दाखवली आहे. डूडलवर क्लिक केल्यावर ‘इंडिया इंडिपेंडंन्स डे’ असा सर्च रिझल्ट येत आहे.