ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील अफगाण दूतावासाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. प्रेस सचिव अब्दुलहक आझाद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आझाद यांनी म्हटले आहे की, ‘मी दुतावासाचे ट्विटर अकाउंट लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र, ते ओपन होऊ शकत नाही. ते हॅक झाले आहे.’
दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबानने आता पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यामुळे सर्वच देश सतर्क झाले असून, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणि दूतावासांना या देशाबाहेर काढण्याचे नियोजन सुरू झाले आहे. असे असतानाच भारतातील अफगाण दूतावासाचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे.