ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 56 लाख 46 हजार 011 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 90 हजार 020 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
मागील 24 तासात 83 हजार 347 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1085 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात10 लाख 03 हजार 299 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 45 लाख 87 हजार 614 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 6 कोटी 62 लाख 79 हजार 462 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 53 हजार 683 रुग्णांची तपासणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.