- मागील 24 तासात 58, 838 नवे रुग्ण; 702 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोनाबाधित रुग्णांनी 77 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात मागील 24 तासात 58 हजार 838 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 लाख 06 हजार 946 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 16 हजार 616 एवढी आहे.
सध्या देशात 7 लाख 15 हजार 812 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 68 लाख 74 हजार 518 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 9 कोटी 86 लाख 70 हजार 363 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख 69 हजार 984 रुग्णांच्या चाचण्या बुधवारी एका दिवसात करण्यात आली.