ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 45 हजार 674 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 559 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 लाख 07 हजार 754 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 26 हजार 121 एवढी आहे.
शनिवारी दिवसभरात 49,082 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 5 लाख 12 हजार 665 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 78 लाख 68 हजार 968 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 11 कोटी 77 लाख 36 हजार 791 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 94 हजार 487 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.7) करण्यात आल्या.