इतिहास जाणून घेतल्यावर अंगावर येईल काटा
देवभूमी नावाने विख्यात उत्तराखंडमध्ये अनेक पवित्र ठिकाणे पहायला मिळतील. दरवर्षी तेथे लाखोंच्या संख्येत भाविक तीर्थस्थळांना भेट देत असतात. तर दुसरीकडे या पवित्र भूमीवर भारतातील सर्वात भीतीदायक जागा देखील आहे. हे स्थान चंपावत जिल्हय़ातील लोहाघाटमध्ये तेथे मुक्ती कोठरी नावाचा एक भुताटकीच बंगाला आहे. याच्या परिसरातील भागाला भारताच्या सर्वात हॉरर जागांमध्ये सामील केले जाते.
परिसरात राहणाऱया लोकांनुसार येथून अनेक चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. याचमुळे कुठलाही स्थानिक व्यक्ती मुक्ती कोठरीच्या नजीक जाण्याचे धाडस करत नाही. मागील काही वर्षांमध्ये या ठिकाणी अनेक रहस्यमय घटना घडल्या आहेत.
मुक्ती कोठरीचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. प्रारंभिक काळात या बंगल्यात एक ब्रिटिश कुटुंब राहत होते. त्यानंतर त्या ब्रिटिश कुटुंबाने या बंगल्याला रुग्णालयासाठी दान केले होते. हा बंगला रुग्णालयात रुपांतरित झाल्यावर प्रचंड लोकप्रिय झाला. अनेक लोक येथे स्वतःवर उपचार करवून घेण्यासाठी येत होते. अचानक एक नवा डॉक्टर येताच सर्वकाही बदलले. हा डॉक्ठर रुग्णांना पाहिल्यावर ते कधी मरणार हे सांगू शकत असल्याचा दावा करायचा.
आश्चर्याची बाब म्हणजे डॉक्टराच्या भविष्यवाणीनुसारच त्या रुग्णाचा त्याच दिवशी आणि त्याच वेळी मृत्यू व्हायचा. स्थानिक लोकांनुसार डॉक्टर त्या रुग्णांना एका गुप्त खोलीत (मुक्ती कोठरी) नेऊन जीवे मारत होता, जेणेकरून स्वतःची भविष्यवाणी खरी ठरेल.
या रुग्णांचे आत्मे अद्याप मुक्ती कोठरीत भटकत असल्याचे म्हटले जाते. याचमुळे आज देखील कुठलाच व्यक्ती या जागेनजीक जाण्याचे धाडस करत नाही. स्थानिक लोकांनुसार तेथे अनेक रहस्यमय घटना घडत असतात.