बरसाना, उत्तरप्रदेश
बरसानामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. हा उत्सव ‘लठ्ठमार’ या नावाने आठवडाभर आधीच साजरा केला जातो. या उत्सवात स्त्रिया पुरुषांना काठीने मारतात आणि पुरुष ढालीने त्यांना रोखण्याचा व त्यांच्यापासून बचावाचा प्रयत्न करतात.
जयपूर आणि बन्सवाडा, राजस्थान
जयपूर व बन्सवाडा येथे ‘हत्ती उत्सवा’ने या होलिकोत्सव सणाची सुरुवात होते. हत्तींना पारंपरिक वेशभूषेत सजवून रस्ते आणि गल्ल्यांमधून फिरवले जाते. उत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी देखील विविध प्रकारचे खेळ आयोजित केले जातात.