ऑनलाईन टीम / बीजिंग :
भारतातून वुहानला जाणाऱ्या एका विमानात 19 भारतीयांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चीनने भीतीपोटी वंदे भारत मिशन अंतर्गत भारतातून येणाऱ्या विमानांवर निर्बंध घातले आहेत.
चीनचा व्हीसा असलेले भारतीय नागरिक आणि चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना चीनमध्ये जाता येणार नाही. मात्र, चीनी राजदूत, सेवा आणि नागरिक व्हिसा असलेल्या लोकांना चीनला जाता येणार आहे. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील.
वंदे भारत मिशन अंतर्गत 30 ऑक्टोबरला चीनमध्ये गेलेल्या विमानात कोरोनाचे रुग्ण सापडल्याचा प्रकार घडला. कोरोनाबाधित 19 रुग्णांपैकी 4 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. 15 जणांना कोणतीही लक्षणे नव्हती.