एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 काळात 43 टक्के घट ः फोर्ड इकोस्पोर्ट आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनानंतरच्या काळात भारतातील कार व्यवहारात तेजी दिसली असली तरी निर्यातीत मात्र घट अनुभवायला मिळाली आहे. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 पर्यंतच्या कालावधीत भारतातून होणाऱया कार निर्यातीत 43 टक्के इतकी घट नोंदविली गेली आहे. यामधील काही कारनिर्मिती कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 च्या कालावधीमध्ये भारतातून फोर्ड इको स्पोर्ट ही गाडी सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. कंपनीने 37 हजार 296 कार्सची विदेशात निर्यात केली आहे. फोर्डच्या इकोस्पोर्टला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या क्रमवारीत शेवर्ले बीट व ह्युंडाई वेर्णा या दुसऱया आणि तिसऱया स्थानावर राहिल्या आहेत. उभय कंपन्यांनी अनुक्रमे 28 हजार 619, 28 हजार 247 गाडय़ांची विदेशात निर्यात केली आहे. फोक्सवॅगन वेंटो 22 हजार 455 गाडय़ांच्या निर्यातीसह पाचव्या स्थानावर आहे. निसान सनी 19 हजार 31 आणि मारुती सुझूकीने 17 हजार 804 एक्सप्रेसोची निर्यात केली आहे.