ऑनलाईन टीम / जयपूर :
कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या धोकादायक व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण राजस्थानातील बिकानेरमध्ये आढळून आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
बिकानेरमधील 65 वर्षीय महिलेने कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते. 30 मे रोजी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. जीनोम सिक्वेन्स आणि चाचणी अहवाल शुक्रवारी आला. त्यामध्ये या महिलेला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले. या महिलेने आता कोरोनावर मात केली आहे. मात्र, ही महिला राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील कोरोना चाचण्या वेगाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.