आयसीएमआरचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकीकडे भारतासह पूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रकोपातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे चीनच्या आणखी एका विषाणूचा धोका देश अन् जगावर घोंगावू लागला आहे. चीनचा कॅट क्यू विषाणू भारतात पोहोचू शकतो असा इशारा आयसीएमआरने दिला आहे. हा विषाणू माणसांमध्ये ज्वर, मेनिंजायटिस आणि मुलांमध्ये इन्सेफलायटीसची समस्या निर्माण करणार असल्याचे आयसीएमआरच्या अहवालात म्हटले गेले आहे.
चीन आणि व्हिएतनाममध्ये कॅट क्यू विषाणूचे अस्तित्व दिसून आले आहे. तेथील क्यूलेस डास आणि डुकरांमध्ये हा विषाणू आढळून आल्याचे आयसीएमआरच्या पुणे येथील नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीच्या 7 संशोधकांच्या दाखल्याने सांगण्यात आले आहे. भारतातही क्यूलेस डासांमध्ये कॅट क्यू विषाणूसारखेच आढळून आल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. सीक्यूवी प्रामुख्याने डुकरांमध्येच आढळतो आणि चीनच्या पाळीव डुकरांमध्ये या विषाणूच्या विरोधातील अँटीबॉडी सापडली आहे. याचाच अर्थ कॅट क्यू विषाणूने चीनमध्ये स्थानिक पातळीवर स्वतःचा प्रकोप फैलावण्यास प्रारंभ केला आहे.
833 पैकी दोन पॉझिटिव्ह
वैज्ञानिकांनी विविध राज्यांमध्ये 883 लोकांचे नमुने घेतले आणि दोन जणांमध्ये विषाणूच्या विरोधातील अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. दोघेही एकाचवेळी विषाणूने संक्रमित झाले होते असे पडताळणीत समजले आहे. माणसांच्या सीरम नमुन्यांच्या चाचणत अँटी सीक्यूवी आयजीजी अँटीबॉडी आढळणे आणि डसंमध्ये सीक्यूवीची रेप्लेशकन कपॅबिलिटीतून भारतात हा आजार फैलावण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत माणसं आणि डुकरांच्या सीरम नमुन्यांची चाचणी केली जावी असे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये जून महिन्यात प्रकाशित संशोधनात म्हटले गेले आहे.