मर्सिडीज बेंझकडून स्थानिक स्तरावर विविध कार्सची निर्मिती
वृत्तसंस्था/ पुणे
दिग्गज वाहन निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझने एक महत्वपूर्ण टप्पा प्राप्त केला आहे. कंपनीने भारतामध्ये एएमजी वाहन-एएमजी जीएलसी 43 मॅटिक कूपे या कारचे प्रथमच स्थानिक स्तरावर उत्पादन सुरु केले आहे. यासोबतच मर्सिडीज बेंझ इंडिया एकाच प्रकल्पामध्ये न्यू जनरेशन कार (एनजीसी), सिडॅन, एसयूव्ही आणि आता एएमजी मॉडेलच्या कार्सची निर्मिती करणार आहे. तसेच मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या पुणे येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रति वर्ष जवळपास 20,000 युनिट असल्याची माहिती आहे. भारतीय बाजारात आम्ही मजबूत स्थिती प्राप्त करणार आहोत. यामध्ये देशात ब्रँडची लोकप्रियता अधिक वाढवून आणि वाहन क्षेत्राला गती देऊन मागणीला बळकटी मिळवली जाणार आहे.ग्
ग्राहकांचा विश्वास जिंकणार
पहिली ‘मेड इन इंडिया’ एएमजी जीएलसी 43 4 मॅटिग कूपे ही गाडी सादर केली आहे. भारतामधील ही एक महत्वपूर्ण कामगिरी असल्याचा दाखला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक आणि कार्यकारी अधिकारी (ऑपरेशन्स) पीयूष अरोडा यांनी दिला आहे. यासोबतच येत्या काळात ग्राहकांचा विश्वास मिळवून ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.