नवी दिल्ली : शाओमीची सहकारी कंपनी ‘एमआय’ने भारतात आजवर 50 लाखहून अधिक स्मार्ट टीव्हींची विक्री करत एक नवा उच्चांक गाठला असल्याचे सांगण्यात येते. 2018 मध्ये भारतात दाखल झालेल्या कंपनीने अल्पावधीतच टीव्ही विक्रीच्या क्षेत्रात यश मिळवले आहे. गेल्या सलगच्या 9 तिमाहीत कंपनीच्या स्मार्ट टीव्हींच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ दिसली असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीच्या स्मार्ट टीव्हींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती लाभली आहे. यावषी दुसऱया तिमाहीत ‘एमआय इंडिया’चा भारतीय टीव्ही बाजारातील वाटा 22 टक्के इतका होता.
कंपनीच्या या टीव्हींवर नेटफ्लीक्स, हॉटस्टार, प्राईम व्हिडिओ यासारख्या सुविधा ग्राहकांना मिळत आहेत.