बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे. अहमदाबाद व दिल्ली येथून या प्राणघातक संसर्गाच्या दुसर्या लाटेचे अहवाल आल्याचे वैद्यकीय शिक्षण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
कोरोनाची आणखी एक लाट कर्नाटकात येण्याची शक्यता असल्याचे मंत्री म्हणाले. दरम्यान नागरिक कसे वागतात यावर अवलंबून आहे. लोक सावध राहिले आणि आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास काहीच हरकत नाही. जर लोक नियमांची पालन करत नसतील तर दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. सुधाकर यांनी कर्नाटकातील कोरोना पॉझिटिव्ह चाचणी करण्यात हलगर्जीपणा होत असल्याचे नाकारत, शनिवारपर्यंत राज्यात एक कोटी लोकांची चाचणी घेण्यात आली असल्याचे सांगितले.
मंत्री सुधाकर यांनी, राज्यात दररोज १.१५ लाख लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही चाचणी वाढविण्यात आली आहे.
कोरोना परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यात कर्नाटक अव्वल स्थानावर आहे. राज्यात सध्याची एकंदर परिस्थिती सुधारत आहे, मार्चच्या अखेरीस कोरोनावर लस निघेल. तोपर्यंत राज्यात कोरोनाचा आलेख खालीच राहील असे मी अपेक्षा करतो.
दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याबद्दल बोलताना मंत्री सुधाकर यांनी १२० विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे. तथापि, तरुणांची या संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि म्हणूनच महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जर प्रसार वाढला तर महाविद्यालये पुन्हा एकदा बंद केली जातील, असे त्यांनी नमूद केले.