ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मागील 24 तासात देशात 88 हजार 600 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1124 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 59 लाख 92 हजार 533 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 94 हजार 503 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 56 हजार 402 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 49 लाख 41 हजार 628 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 7 कोटी 12 लाख 57 हजार 836 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 87 हजार 861 कोरोना चाचण्या शनिवारी एका दिवसात करण्यात आल्या.