ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाबाधितांनी 35 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात देशात 78 हजार 761 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 948 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 35 लाख 42 हजार 734 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 63 हजार 498 एवढी आहे.
सध्या देशात 7 लाख 65 हजार 302 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 27 लाख 13 हजार 934 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात 4 कोटी कोरोना चाचण्या
देशात आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 61 हजार 636 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 55 हजार 027 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.