- मागील 24 तासात 49,881 नवे रुग्ण; 517 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 49 हजार 881 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 517 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 80 लाख 40 हजार 203 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 20 हजार 527 एवढी आहे.
सध्या देशात 06 लाख 03 हजार 687 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 73 लाख 15 हजार 989 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 10 कोटी 65 लाख 63 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 75 हजार 760 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.