ऑनलाईन टीम / हैदराबाद :
भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV) सोबत एकत्र येऊन कोरोनावर भारतीय बनावटीची पहिली लस तयार केली आहे. ट्विटद्वारे भारत बायोटेकने यासंदर्भात माहिती दिली आहे.
हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार आहे.
या लसीच्या मानवी चाचण्या करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआयने)आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे.