पहिल्या टप्प्यात केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वापर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. भारतात लसीकरणासाठी 82 लाख लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. ही केंद्रे युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रमांतर्गत (यूआयपी) बांधण्यात आली आहेत. तथापि, देशात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वापर केला जाणार आहे.
यूआयपी रिव्ह्यू आणि बहुवार्षिक नियोजन दस्तऐवजानुसार देशात 81.87 लाखांहून अधिक लसीकरण केंद्रे आहेत. जिथे विविध प्रकारचे लसीकरण केले जाते. यातील बहुतांश केंद्रे आरोग्यसेवा आणि प्रशासकीय कामगारांचे लसीकरण झाल्यानंतर सुरू होतील.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या तयारीत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी सर्व राज्ये केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वापर करतील.