- मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोनाबाधित रुग्णांनी 66 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात मागील 24 तासात 74 हजार 422 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 23 हजार 816 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 02 हजार 685 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 34 हजार 427 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 55 लाख 86 हजार 704 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 7 कोटी 99 लाख 82 हजार 394 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 89 हजार 860 रुग्णांची तपासणी रविवारी एका दिवसात करण्यात आली.