ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोनाबाधित रुग्णांनी 68 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात मागील 24 तासात 78 हजार 524 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 971 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 05 हजार 526 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 02 हजार 425 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 8 कोटी 34 लाख 65 हजार 975 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 94 हजार 321 रुग्णांच्या चाचण्या बुधवारी एका दिवसात करण्यात आली.