रेटिंगमध्ये मोठी घसरण : सेंसर टॉवरच्या अहवालामधून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सर्वत्र लॉकडाऊनचा काळ सुरू असून अनेकजण इंटरनेटच्या वापरावर भर देत आहेत. सोशल मीडियावर व्हॉटस्अप, फेसबुक, युटय़ूबचा वापर सर्वाधिक होत असून टिकटॉकच्या वापरात घट झाल्याचे समजते.
भारतमध्ये लोकप्रिय असणारे व्हीडीओ शेअरिंग ऍप टिकटॉकच्या टीआरपीमध्ये वेगाने घसरण होत असल्याचे समोर आले आहे. प्लेस्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग घसरून 4.4 ते 1.2 वर पोहोचले आहे. तसेच डाऊनलोडमध्येही मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.
मे महिन्यात टिकटॉक ऍप मात्र 17 दशलक्ष ग्राहकांनी डाऊनलोड केले आहे. हा आकडा लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या महिन्यातील असून या कालावधीत सर्वाधिक ऍप भारत आणि चीन या देशांमध्ये डाऊनलोड करण्यात आले आहे. मार्चमध्ये टिकटॉकला 3.57 कोटी लोकांनी डाऊनलोड केले असल्याचे सेंसर टॉवरच्या माहितीमधून समोर आले आहे.
जाहिरात उद्योग अंतर ठेऊन
कोविड 19च्या महामारीमुळे जाहिरात उद्योगाने टिकटॉक, फेसबुकसह सोशल मीडिया प्लॅटफार्मच्या पॅकेजमध्ये मोठी कपात केली असल्याची माहिती काही माध्यमांच्या अहवालामधून देण्यात आली आहे. या अगोदर टिकटॉकवर फेसबुकचा हक्क असणाऱया इंस्टाग्रामसोबत अन्य डिजिटल प्लॅटफार्मपेक्षाही अधिक जाहिराती मिळत होत्या.