ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रगत रसायनशास्त्र सेल बॅटरी स्टोरेजसाठी राष्ट्रीय कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत देशात दीर्घकाळ चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी बनवल्या जातील. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील बॅटरी स्टोरेज उत्पादनाला चालना देण्यासाठी 18,100 कोटी रुपयांचे उत्पादन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) देण्याचा निर्णय झाला. सरकारच्या या निर्णयामुळे बॅटरी उपकरणांची आयात कमी होईल आणि देशात उत्पादन सुरू होईल.
प्रगत रसायनशास्त्र सेल (एसीसी) बॅटरी स्टोरेज भारतात तयार केले जाईल. यामुळे देशातील इलेक्ट्रिकल वाहन, विद्युत गतिशीलता यांना चालना मिळेल.