ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा अनियंत्रित झाला असून, जगात कोरोनाने पुन्हा संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या एक टक्क्याहून जास्त आहे. तर भारतात ही संख्या 4.5 टक्के आहे.
इंडियन मेडिकल कौऊंन्सिलच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, जगभरात कोरोना विषाणू अनियंत्रित झाल्यानंतर भारत, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनसह अनेक देशात लसीकरणाने वेग घेतला आहे. मात्र, जगभरात पुन्हा संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या एक टक्क्याहून जास्त आहे. तर भारतात ही संख्या 4.5 टक्के आहे. दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या संसर्गाच्या जिनोमचे या अभ्यासात विश्लेषण करण्यात आले नाही.
देशातील वाढती रुग्णसंख्या आणि कोरानाचे नवे स्ट्रेन चिंतेचा विषय बनले आहेत. महाराष्ट्रासह आठ देशात कोरोनाच्या संसर्गाने वेग घेतला आहे. पहिल्यांदा बाधित झालेल्या रुग्णाच्या शरिरात ज्या अँटिबॉडी तयार झाल्या, त्या नष्ट झाल्याने हे रुग्ण पुन्हा संक्रमित होत असावेत. त्यामुळे दुसऱ्यांदा संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे आढळत आहेत, असेही या अभ्यासात म्हटले आहे.