ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 29 हजार 398 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 414 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 97 लाख 96 हजार 770 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 42 हजार 186 एवढी आहे.
गुरुवारी दिवसभरात 37,528 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 63 हजार 749 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 92 लाख 90 हजार 834 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 15 कोटी 16 लाख 32 हजार 223 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 8 लाख 72 हजार 497 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.10) करण्यात आल्या.