ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी देशात 77 हजार 266 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 लाख 87 हजार 501 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 61 हजार 529 एवढी आहे.
सध्या देशात 7 लाख 42 हजार 023 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 25 लाख 83 हजार 948 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 3 कोटी 94 लाख 77 हजार 848 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 01 हजार 338 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.