ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 67 हजार 151 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1059 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 32 लाख 34 हजार 475 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 59 हजार 449 एवढी आहे.
सध्या देशात 7 लाख 07 हजार 267 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 24 लाख 67 हजार 759 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 3 कोटी 76 लाख 51 हजार 512 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 23 हजार 992 रुग्णांची तपासणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.