दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री श्रिया सरनचे चाहते भारतासह जगभरात आहेत. श्रिया दक्षिणेतील सर्वात यशस्वी आणि चर्चेतील अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केले आहे. ‘दृश्यम’ या बॉलिवूडमधील चित्रपटातही तिने उत्तम अभिनय केला होता. श्रिया इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रीय असते.
श्रियाने अलिकडेच स्वतःच्या घरातील सामान पॅक करतानाची एक चित्रफित प्रसारित केली आहे. यात तिचा पती आणि काही मित्र सामान पॅक करताना दिसून येतात. ‘भारतात परतत आहे. कुटुंबीयांची आठवण येत आहे’ असे श्रियाने चित्रफितीसोबत नमूद केले आहे. श्रिया भारतात परतत असल्याने तिचे चाहते आनंदी झाले आहेत.
श्रिया विवाहानंतर पतीसोबत बार्सिलोना येथे राहायला गेली होते. श्रिया आणि तिचा पती एंड्रे हे परस्परांना प्रथम मालदीवमध्ये भेटले होते. तेथेच दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.