कोलकाता येथील इन्स्टिटय़ूट ऑफ चाईल्ड हेल्थच्या रुग्णालयात एका अतिदुर्मीळ रोगाशी झुंजणारे एक बालक दाखल करण्यात आले आहे. या बालकाला रोहाडनेट हा विकार जडला आहे. यालाच भस्म्या रोग असेही म्हणतात. यात रुग्णाला इतकी भूक लागते की तो आपल्याच शरीराचे भाग तोडून खाऊ लागतो. हा विकार संपूर्ण जगात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्मया लोकांनाच झालेला आढळला आहे. सध्या तरी या रोगावर कोणताही उपाय नाही.
या बालकाच्या मणक्मयात टय़ुमरची गाठ आल्याचे प्रथम आढळून आले. या गाठीमुळे त्याच्या शरीरातील हार्मोन्सचे समीकरण बदलले. त्यामुळे त्याला प्रचंड भूक लागते. कितीही खाल्ले तरी समाधान होत नाही. या बालकाने भुकेपोटी आपल्या हाताची काही बोटे खाल्ल्याचेही आढळून आले आहे. स्वतःची जीभही त्याने चावली आहे. अवघ्या एका महिन्यात या पाच वर्षाच्या बालकाचे वजन 16 किलोवरून 32 किलो झाले. अचानक झालेल्या या वजनवाढीमुळे तो अंथरुणावरून उठूही शकत नाही. दर पाच मिनिटाला त्याला भूक लागते आणि त्यावेळी खाणे न मिळाल्यास स्वतःच्या शरीराचे अवयवच तो चावू लागतो. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी रात्रंदिवस त्याचे आईवडील रुग्णालयातच ठाण मांडून आहेत. एक नर्सही विशेषत्वाने त्याच्यावर लक्ष ठेवत आहे. असा विकार कधीच पाहण्यात न आल्याने डॉक्टरांनाही काय करावे? हे सूचेनासे झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून होत आहे. तथापि, हा विकार असाध्य असल्यामुळे ते अगतिक झाले आहेत.