ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 43 हजार 091वर पोहचली असून, आतापर्यंत 1 लाख 80 हजार 013 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही देशात 1 लाख 53 हजार 178 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील 24 तासात देशात 10 हजार 667 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाने 9900 जणांचा बळी घेतला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 744 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 42 हजार 829, तामिळनाडूत 46 हजार 504, गुजरातमध्ये 24 हजार 055, मध्यप्रदेश 10 हजार 935, आंध्र प्रदेश 6456, बिहार 6650, राजस्थान 12 हजार 981, उत्तरप्रदेश 13 हजार 615 तर पश्चिम बंगालमध्ये 11 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.