ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 39 लाख 36 हजार 748 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 30 लाख 37 हजार 152 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 8 लाख 31 हजार 124 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 68 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मागील 24 तासात देशात 83 हजार 341 कोरोना रुग्ण आढळले. तर 1096 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात 4 कोटी 66 लाख 79 हजार 145 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 69 हजार 765 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.