नवी दिल्ली
पाकिस्तानसोबत वृद्धिंगत होत असलेल्या संबंधांवरून भारताने चिंता करू नये. रशिया अन्य देशांच्या संवेदनशीलतेचा आदर करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. पाकिस्तानसोबत करण्यात आलेला सराव हा दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग होता, असा दावा रशियाचे राजदूत निकोले युदावेश यांनी केला आहे. याचबरोबर युदाशेव यांनी एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीप्रकरणी तुर्कस्तानवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांवरही भूमिका मांडली आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी एकपक्षीय निर्बंधांचे स्वागत करत नाही. भारतासंबंधी अमेरिकेची स्थिती स्पष्ट नसल्याचे ते म्हणाले.