ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनकडून आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट सदोष आढळल्याने भारताने दक्षिण कोरियाकडून 9.5 लाख कोविड किट मागवले आहेत.
या किटच्या निर्मितीला मानसेरमध्ये सुरुवात झाली आहे. कमी वेळात निदान होणारी तसेच योग्य किंमत आणि चांगली गुणवत्ता असलेले हे किट आहेत. भारताने दक्षिण कोरियाला 9.5 लाख किटची ऑर्डर दिली आहे. दक्षिण कोरियातील भारतीय दूतावास श्रीप्रिया रंगनाथ यांनी सांगितले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारतीय परराष्ट्र सचिव, कोरीया उपपरराष्ट्र मंत्री आणि इंडो पॅसिफिक देशांतील इतर सदस्य प्रत्येक आठवड्यात नवे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी चीनमधील Wondfo Biotech आणि Livzon Diagnostics या दोन कंपन्यांकडून 5 लाख कोरोना टेस्टिंग किट आयात करण्यात आले होते. या किटमधून चुकीचे निदान होत असल्याच्या तक्रारी राजस्थानमधून आल्याने या किटचा वापर थांबण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.