ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आज भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. भारतात देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी आज 15 कोटीचा टप्पा ओलांडला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 22,07,065 सत्राद्वारे लसीच्या 15,00,20,648 मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये 93,67,520 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 61,47,918 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,23,19,903 आघाडीचे कर्मचारी (पहिली मात्रा), 66,12,789 आघाडीचे कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 5,14,99,834 लाभार्थी (पहिली मात्रा), 98,92,380 (दुसरी मात्रा), 45 ते 60 वयोगटातल्या 5,10,24,886 (पहिली मात्रा), आणि 31,55,418 लाभार्थी (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 67.18% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात एकूण 21 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या. लसीकरण अभियानाच्या 103 व्या दिवशी (28 एप्रिल 2021) ला 21,93,281 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 20,944 सत्रात 12,82,135 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 9,11,146 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.