ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताप्रमाणेच आज जगात इतर पाच देशांचाही स्वातंत्र्य दिन आहे. भारतासह दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, बहरीन, कांगो आणि लिकटेंस्टीन या देशांनाही आजच्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्याला आज 73 वर्ष पूर्ण झाली. जपानकडून उत्तर आणि दक्षिण कोरियाला 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळाले. बहरीनला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
कांगो या देशाला 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. तर लिकटेंस्टीन या देशाला 15 ऑगस्ट 1866 रोजी जर्मनीकडून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारतासह हे पाचही देश आज आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात.