एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली माहिती
चेन्नई
फूड पॉइझनिंगच्या घटनेच्या विरोधात ऍपल सप्लायर फॉक्सकॉनचे चेन्नईजवळ असणारे प्रकल्प चालू आठवडय़ात बंद राहणार असल्याची माहिती आहे. कांचीपुरमच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या प्रकल्पाला पाच दिवसांची सुट्टी जाहिर केली असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भात तामिळनाडूच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
फॉक्सकॉन आणि ऍपलकडून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाहे. फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये मागील आठवडय़ात फूड पॉइझनिंगची घटना घडल्यानंतर जवळपास 150 कर्मचाऱयांना रुग्णालयात भरती केले होते. याच प्रकल्पात आयफोन
12 मॉडेलची निर्मिती केली जात आहे.
पुरवठा साखळी होणार प्रभावीत?
मार्केट रिसर्च फर्म आयडीसीचे संचालक नवकेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार सध्या मंदीचा कालावधी असून जो कमीत कमी फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. तसेच 2022 च्या पहिल्या तिमाहीत नवीन उत्पादनाच्या सादीकरणानंतर विक्रीमध्ये तेजी राहणार असली तरी पाच दिवसांच्या बंदमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.
वर्षभरात दुसरी घटना
फॉक्सकॉनमध्ये एक वर्षभरात देशातील हा दुसरा प्रकार असून यामुळे कंपनीचे काम थांबवावे लागले आहे.