ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेत आज भारतीय महिला तिरंदाजांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. 18 वर्षांखालील महिला कंपाऊंड कॅडेट संघातील भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधू वरशिनी सेंथिलकुमार या त्रिकुटाने अंतिम सामन्यात तुर्कस्तानचा 228-216 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
GOLD for #TeamIndia‘s Compound Cadet U18 Women’s team at the 2021 World Archery Youth Championships.
— JSW Sports (@jswsports) August 14, 2021
India’s Priya Gurjar, Varshini Senthilkumar and Parneet Kaur beat Hazal Burun, Irmak Yuksel and Nehir Sarihan of Turkey 2⃣2⃣8⃣ – 2⃣1⃣6⃣ to win 🥇.pic.twitter.com/0ATEqawJtJ
पोलंड येथे सध्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताने प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधू वरशिनी सेंथिलकुमारने स्पर्धेच्या पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली होती. या तिरंदाजपटूंनी पात्रता फेरीत 2160 पैकी 2067 गुण पटकावले होते. हा स्कोअर जागतिक विक्रमापेक्षा 22 गुणांनी जास्त आहे. यापूर्वी अमेरिकेच्या संघाने 2045 धावा केल्या होत्या. याशिवाय प्रिया आणि कुशल दलाल जोडीने 1401 धावांच्या धावसंख्येसह विश्वविक्रम केला होता आणि कंपाऊंड कॅडेट मिश्र संघाच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले होते.