कैरो : येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत पुरूषांच्या सांघिक स्किट नेमबाजी प्रकारात भारताने कास्यपदक पटकाविले.
पुरूषांच्या सांघिक स्किट नेमबाजी प्रकारात भारताच्या मिराज अहमद खान, अगंड वीर सिंग बावा आणि गुरज्योत खेंगुरा या नेमबाजांनी कझकस्तानच्या संघाला 6-2 अशा गुणांनी पराभूत करत कास्यपदक मिळविले. या स्पर्धेतील तिसऱया दिवशी भारताला पुरूषांच्या सांघिक स्किट नेमबाजीत कास्यपदक मिळाले. या क्रीडा प्रकारात रशियाने सुवर्णपदक मिळविताना झेक प्रजासत्ताकचा 6-0 अशा गुणांनी पराभव केला.