प्रतिनिधी /पणजी
भारतीय आयुर्विमा महामंडळ, 14 देशां मध्ये आपली पदचिन्ह असलेला एक प्रमुख आर्थिक समूह, 1 सप्टेंबर, 2021 रोजी आपल्या अस्तित्वाच्या 66 व्या वर्षात प्रवेश करत आहे.
राष्ट्रीयकरणाच्या उद्दिष्टांना जागत, एलआयसी जीवन विम्याचा संदेश सर्व विमायोग्य लोकांपर्यंत वाजवी किंमतीत पोहचवण्यासाठी कटीबद्ध आहे.
1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भांडवलापासून सुरुवात करून आज एलआयसीकडे रु. 34,36,686 कोटींच्या लाइफ फंड सह रु. 38,04,610 कोटी इतका मालमत्ता आधार आहे. ब्रँड फायनान्स इन्श?रन्स 100 ने जाहीर केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार एलआयसीला जगातला तिसरा सर्वात सशक्त आणि दहावा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे.
विमा क्षेत्र खुले होऊन दोन दशके झाली असली तरी एलआयसी अद्यापही पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नात 66.18ज्ञ् आणि पॉलिसींच्या संख्येत 74.58ज्ञ् अशा बहुतांश हिश्शासह विमा मार्केटचे नेतृत्व करत आहे. वर्ष 2020-21 दरम्यान, 31 मार्च 2021 पर्यंत, एलआयसीने 2.10 कोटी नवीन पॉलिसी विकल्या आणि 1.84 लाख कोटी रुपये जमा करून नवीन व्यवसायात पहिल्या वर्षाच्या प्रीमियम मध्ये 3.48ज्ञ् ची वाढ नोंदवली. आमच्या पेन्शन आणि समुह विमा व्यवसायाने सलग दोन वर्षे ट्रिलियनचा आकडा पार करत रु. 1,27,769 कोटी नवीन व्यवसाय प्रीमियम जमा केले.
आमची 8 झोनल कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 74 ग्राहक क्षेत्रे, 2048 शाखा कार्यालये, 1546 उपग्रह कार्यालये, 42000 हून अधिक प्रीमियम पॉइंट्स आणि लाइफ प्लस कार्यालये, एक लाखांहून अधिक कर्मचारी तसेच 13.53 लाख एजंट ह्या द्वारे ग्राहकांना आमच्या सर्वोत्तम सेवांचे आश्वासन आहे. याशिवाय, एलआयसीने उत्पादकता वाढवण्यासाठी 8 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 6 खाजगी बँका, 13 प्रादेशिक ग्रामीण बँका, 41 सहकारी बँका आणि 1 विदेशी बँक यांच्याशी करार केला आहे. व्यवसायात गुणात्मक आणि संख्यात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एलआयसीकडे एक प्रबळ वितरण चॅनेल आहे.
1956 मध्ये स्थापनेपासून राष्ट्राच्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये पॉलिसीधारकांच्या आणि व्यापक समुदायीक हितांसाठी निधी उपलब्ध करून एलआयसी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. राष्ट्रीय प्राथमिकता आणि पॉलिसीधारकांना वाजवी मोबदला हे आमच्या गुंतवणुकीचे मुख्य निकष आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत अशा सामुदायिक हितांसाठी गुंतवलेला एकूण निधी रु 36,76,170 कोटी इतका आहे.
आज एलआयसी व्यक्तिगत विम्या अंतर्गत विक्रीसाठी 32 योजनांचा पुष्पगुच्छ सादर करते, ज्यातली प्रत्येक योजना समाजातील विविध घटकांच्या गरजा पूर्ण करते, जसे एन्ड?वमेंट, मुदत विमा, बाल योजना, पेन्शन, सूक्ष्म विमा, आरोग्य विमा आणि युनिट लिंक्ड उत्पादने इत्यादी. ग्राहकांना त्यांच्या बदलत्या गरजेनुसार सर्वोत्तम उत्पादने देऊ केली जातात.
2020-21 मध्ये एलआयसीने रु 1,47,754 कोटी रकमेचे 229.15 लाख विमा दावे दिले आहेत.
ग्राहकांना समस्यारहित सेवा पुरवण्यासाठी तसेच विक्री आणि सेवा सुलभ करण्यासाठी एलआयसी नेहमीच तंत्रज्ञानाला आत्मसात करत आली आहे. एलआयसीने किंमतीं मध्ये सुधारणा आणि कार्यक्षमता निर्माण करण्या व्यतिरिक्त अनेक ग्राहक-केंद्रित पुढाकार घेतले आहेत.
इलेक्ट्रॉनिक प्रीमियम भरण्यासाठी एलआयसीने विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ घेतला आहे जेणेकरून ग्राहकांना कधीही, कुठेही प्रीमियम भरण्याची सोय व निर्विघ्न सेवांचा अनुभव मिळेल. शाखा आणि उपग्रह कार्यालयां व्यतिरिक्त बँकांना स्थायी सूचना देऊन, डेबिट/पेडिट कार्डद्वारे, नेट बँकिंग, आयएमपीएस, वॉलेट्स, प्रीपेड कार्ड्स, ऍप्स द्वारे, अधिकृत प्रीमियम संग्रह केंद्रांद्वारे प्रीमियम भरला जाऊ शकतो. अँड्रॉइड आणि विंडोज फोनवर डाऊनलोड करण्या योग्य माय एलआयसी (श्भ् थ्घ्ण्) ऍपचा वापर करून प्रीमियम ऑनलाईन भरला जाऊ शकतो. पेटिएम, फोनपे, गुगलपे, अ??मॅझाँन पे, मोबिक्वकि ही काही अलीकडील ऍप आधारित माध्यमे आहेत जी ग्राहकांना ऑनलाइन प्रीमियम भरण्यासाठी उपलब्ध आहेत (यूलिप, आरोग्य आणि ई -टर्म पॉलिसी वगळता).
डिजिटल मध्यामांद्वारे जमा झालेले पॉलिसि नूतनीकरण प्रीमियम एकूण जमा रकमेच्या 74.8ज्ञ् आहे जो एक सर्वकालीन उच्चा?क आहे.
कर्जाची परतफेड आणि कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी ऑनलाइन सुविधा ग्राहक पोर्टलद्वारे लॉगिनसह किंवा त्याशिवाय ही उपलब्ध आहे. ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाईन कर्जाची विनंती प्रीमियर सेवा नोंदणीकृत ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.
एलआयसीने आता उपग्रह कार्यालयांमध्ये पॉलिसी पुनर्चलन करणे आणि देशभरातील कोणत्याही शाखेत दावा फॉर्म सादर करणे सुलभ केले आहे. कालातीत पोलिसींचे पुनर्चलन करण्यासाठी एलआयसीने 23.08.2021 ते 22.10.2021 पर्यंत विशेष पुनर्चलन मोहीम सुरू केली आली आहे.
यूलिप पॉलिसी अंतर्गत फंड प्रकार बदलणे आता ऑनलाइन केले जाऊ शकते. एलआयसीचे चॅटबॉट, ’एलआयसी मित्र’, विक्रीसाठी उपलब्ध योजना, सेवा संबंधित प्रश्न आणि प्रीमियम पेमेंट चौकशीवर विविध प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे.
कर्मचारी आणि एजंटांना डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मची सुविधा प्रदान केली गेली आहे. महामंडळाच्या कर्मचार्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी ‘ज्ञानपीठ’ चा शुभारंभ त्या दिशेने एक पाऊल आहे.
एलआयसीने पेपरलेस मॉडय़?लद्वारे नवीन पॉलिसीसाठी ऑनबोर्डिंग प्रक्रियेचे एक साधन म्हणून “आनंदा’’ (आत्मनिर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजिटल मोबाइल अ??प्लकेशन) ह्या एका मोबाईल ऍपचा शुभारंभ केला आहे.
एलआयसी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन, वर्ष 2006 मध्ये स्थापित, महामंडळाच्या सामुदायिक विकास उपक्रमाची पूर्तता करते आणि गरिबी किंवा संकटातून मुक्ती, शिक्षणाची प्रगती, वैद्यकीय मदत आणि सामान्य सार्वजनिक उपयुक्ततां वर लक्ष केंद्रित करणार्या विविध प्रकल्पांवर कार्य करते. स्थापनेपासून फाउंडेशनने 589 प्रकल्प प्रायोजित करून वरील कारणांसाठी समर्पित गैर सरकारी संस्था?ना पाठबळ दिले आहे.
एक अग्रगण्य जीवन विमा कंपनी असण्या व्यतिरिक्त, एलआयसी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आर्थिक समूह आहे ज्याची उपस्थिती चौदा देशांमध्ये आहे. एलआयसी एचएफएल, एलआयसी पेन्शन फंड लिमिटेड, एलआयसी म्युच्य?अल फंड अ??न्ड एएमसी लिमिटेड, एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेड, आयडीबीआय बँक लिमिटेड, एलआयसी एचएफएल केअर होम्स लिमिटेड, एलआयसी एचएफएल फायनान्शयिल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एलआयसी एचएफएल असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे एलआयसीने इतर वित्तीय सेवांमध्ये प्रवेश केला आहे.
एलआयसीने 2020-21 मध्ये विमा श्रेणीमध्ये 19 पुरस्कार जिंकले आहेत. कॉर्पोरेट गव्हर्नन्स साठी गोल्डन पीकॉक अवॉर्ड आणि रीडर्स डायजेस्ट अवॉर्ड्स-मोस्ट ट्रस्टेड ब्रँड हे उल्लेखनीय आहेत. कोविड -19 महामारीच्या आव्हानात्मक काळात एलआयसी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि आमच्या सन्माननिय पॉलिसीधारकांना निर्विघ्न, समस्या विरहित सेवा प्रदान करण्यात यशस्वी आहे. या वर्धापन दिना निमित्त, आम्ही आमच्या पॉलिसीधारक आणि भागधारकांचे आमच्यावर अतूट विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानतो. आम्ही आमच्या ग्राहकांच्या कल्याणासाठी “योगक्षेमं वहाम्याहम” (तुमचे कल्याण ही आमची जबाबदारी आहे) या बोधवाक्मयाच्या खर्या अर्थाने स्वतःला पुन्हा समर्पित करतो.