वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 साली होत असलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय चमूच्या सदिच्छा प्रतिनिधीसाठी (गुडवील अँबेसिडर) भारतीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सौरभ गांगुलीला खास निमंत्रण दिले आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय पथकाचे गुडवील अँबेसिडर म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने गांगुली यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.