वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही औषध कंपन्यांच्या संशोधनातून लसीसंदर्भात चाचणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे देशातील ज्युबिलंट लाईफ साइसेज, हेटेरो तसेच सिप्ला या तीन दिग्गज औषध कंपन्यांनी अमेरिकी औषध कंपनी गिलियडसोबत कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱया रेमडेसिवीर औषध बनविण्यासाठी करार केला आहे.
सदरच्या करारांतर्गत 127 सह अन्य लहान, मध्यम व प्रगत असणाऱया देशांसाठी औषधांचे मार्केटिंग करणार आहे. गिलियड यांनी दिलेल्या माहितीनुसार लायसन्ससोबत कराराचाही समावेश करण्यात आला आहे. करारात समावेश असणाऱया कंपन्यांकडे गिलियडच्या रेमडेसिवीर बनविण्याच्या प्रक्रियेसह टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर करण्याचाही अधिकार राहणार आहे. यामुळे उत्पादनाला वेग येणार असल्याचा अंदाज मांडला आहे. परंतु या प्रक्रियेनंतर लायसन्स कंपन्या जेनरिक उत्पादनांची निर्मिती करु शकणार आहेत. तसेच त्यांची किमत निश्चित करण्याचा अधिकारही त्याच कंपन्यांकडे राहणार आहे.