वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय कंपन्यांची विदेशामधील प्रत्यक्ष गुंतवणूक चालू आर्थिक वर्षातील डिसेंबर महिन्यात जवळपास 8 टक्क्यांनी घटून 2.05 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय)ने याबाबतची माहिती दिली आहे.
देशातील कंपन्यांनी आपल्या विदेशी संयुक्त उद्योग आणि पूर्ण हक्क असणाऱया कंपन्यांमध्ये डिसेंबर 2020च्या दरम्यान 2.23 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. आरबीआयने डिसेंबर 2021 साठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक आकडेवारीनुसार भारतीय कंपन्यांकडून डिसेंबरच्या दरम्यान विदेशामध्ये करण्यात आलेली एकूण गुंतवणूक 1.22 अब्ज डॉलरची आहे.
यासोबतच 46.39 कोटी डॉलर इक्विटी भागीदारी तसेच 36.17 कोटी डॉलरच्या गुंतवणूक कर्जाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आपल्या विदेशी उपक्रमांमध्ये भांडवल लावणाऱया प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये एएनआय टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. सोबतच ओलाच्या प्रवक्त्यांनी सिंगापूरमध्ये मालकीच्या असणाऱया कंपनीत 67.5 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लि. यांनी जर्मनी आणि नॉर्वेमध्ये आपला संयुक्त उद्योग व पूर्ण मालकीसह मिळून 16.86 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. तसेच गेल इंडियाने म्यानमार आणि अमेरिकेमध्ये 7 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.