फॉर्च्यून-2020 च्या यादीमध्ये इंडियन ऑईलला मागे टाकले रिलायन्सची झेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचा प्रवास हा नवनवीन विक्रम नोंदवणारा राहिला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजने आणखीन एक नवीन विक्रम प्राप्त केला असून 2020 च्या भारतीय कंपन्यांच्या फॉर्च्यून 500 च्या यादीमध्ये सलग दुसऱयांदा सर्वोच्च स्थान मिळवले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) कंपनीला सलग दुसऱयांदा मागे टाकले आहे. सदरची यादी आर्थिक वर्ष 2019-20 च्या आर्थिक आकडेवारीवर निश्चित केलेली आहे.
2020 च्या फॉर्च्यून-2020 यादीत तेल आणि गॅस कंपन्यांचा दबदबा राहिला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज, आयओसीएल, ओएनजीसी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पहिल्या दहामध्ये राहिल्या आहेत.
38 कंपन्यांचा महसूल50 हजार कोटींवर
या यादीत भारतीय कंपन्यांनी चांगली कामगिरी नोंदवली आहे. 2020च्या फॉर्च्यून-500 यादीमध्ये समावेश असणाऱया 38 कंपन्यांचा महसूल हा 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. सदर कंपन्यांची पहिल्या 500 कंपन्यांच्या एकूण महसूल कमाईत हिस्सेदारी 60 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केली आहे. दुसऱया बाजूला 139 कंपन्यांची महसूल कमाई 3 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी रहिल्याची माहिती आहे.