मूडीज संस्थेच्या अंदाजातून माहिती स्पष्ट
नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर आर्थिक क्षेत्राने गती घेण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळाले आहे. याच वातावरणाचा सकारात्मक लाभ भारतीय कंपन्यांना पुढील वर्षात होणार असल्याचा अंदाज मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिस या संस्थेने नोंदवला आहे. रेटेड भारतीय बिगर-फायनान्शिअल कॉर्पोरेटसाठी 2021 आउटलूकमध्ये मूडीजने उद्योग क्षेत्रातील जवळपास सर्वच क्षेत्रात मागणी वाढत जाणार असून याचा फायदा भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्राला होणार असल्याचा अंदाजही यावेळी व्यक्त केला आहे.
वर्ष 2022 मध्ये आर्थिक वर्ष समाप्त होताना भारताचा आर्थिक विकासदर हा 10.8 टक्क्यांवर राहणार असल्याचे संकेत मूडीज ऍनालिस्ट श्वेता पटौदिया यांनी वर्तवले आहेत.
व्याजदरासह-मजबूत कंपन्या
कमी व्याजदर आणि त्यातून कर्जाची होणारी उपलब्धता यामुळे मजबूत ताळेबंद असणाऱया कंपन्यांना कमी वेळेत कर्ज मिळून विकासावर भर देण्यास मदत होणार आहे. यामुळे कंपन्यांना भेडसावणारा आर्थिक प्रश्न कायमचा न सुटता तो काही प्रमाणात का असेना राहणार असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.