वृत्तसंस्था/ डब्लीन (आयर्लंड)
23 वर्षांखालील वयोगटाच्या युनिफर महिलांच्या पाच देशांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला कनिष्ठ हॉकी संघाने विजयी सलामी देताना यजमान आयर्लंडचा 4-1 असा पराभव केला.
रविवारच्या सामन्यात भारतातर्फे अन्नूने 12 व्या मिनिटाला, दीपिका सोरेंगने 25 व्या मिनिटाला, मोनिका टोप्पोने 45 व्या आणि ब्युटी डुंगडुंगने 47 व्या मिनिटाला गोल नोंदविले. आयर्लंडतर्फे एकमेव गोल 19 व्या मिनिटाला मिकेला पॉवरने केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने आयर्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. आता या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा दुसरा सामना येथे हॉलंडबरोबर होणार आहे.