वृत्तसंस्था/ सांतियागो, चिली
शेवटच्या सत्रात केलेल्या चमकदार प्रदर्शनाच्या बळावर भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने चिलीच्या कनिष्ठ महिला संघावर 4-2 अशी मात केली. प्रिन्स ऑफ वेल्स कंट्री क्लब येथे झालेल्या या सामन्यातील शेवटच्या नऊ मिनिटांत भारताने तीन गोल नोंदवले. त्याआधी या दौऱयातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने चिलीवर 5-3 अशी मात करून विजयी सुरुवात केली होती. या सामन्यात भारताच्या ब्युटी डुंगडुंगने हॅट्ट्रिक नोंदवली होती.
मंगळवारी झालेल्या दुसऱया सामन्यात गगनदीप कौरने (51 व 59 वे मिनिट) दोन, मुमताज खान (21), संगीता कुमारी (53) यांनी भारताचे गोल नोंदवले तर चिलीचे गोल अमांदा मार्टिनेझ (4) व डॉमिंगा लुडर्स (41) यांनी नोंदवले. चिलीने प्रारंभापासूनच भारतावर दडपण ठेवले होते आणि चौथ्याच मिनिटाला त्यांना पहिले यशही मिळाले. पेनल्टी कॉर्नरवर मार्टिनेझने हा गोल नोंदवून आघाडी घेतली. भारतानेही आक्रमण तेज करीत 21 व्या मिनिटाला बरोबरी साधली. मुमताजने हा गोल नोंदवला. बुधवारी भारतीय संघ या दौऱयातील तिसरा सामना होणार आहे.