सिध्दनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतली लस
वार्ताहर / व्हनाळी
भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित आहे. देशात अजुनही कोरोना थैमान घालत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत आहे. याचा धोका लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना बसू लागला आहे. याचे गांर्भीर्य लक्षात घेवून आपल्या आरोग्याच्या दृर्ष्टीने सुरक्षित असलेली ही लस सर्वांनी घ्यावी. असे आवाहन करीत शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सिद्धनेर्ली ता.कागल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतली सोबत त्यांच्या पत्नी गोकुळच्या माजी संचालिका अरूंधती घाटगे यांनी ही लस घेतली.
घाटगे यांनी कोरोनोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. लस घेतल्यानंतरच त्यांनी त्याचे परिणाम पाहुन ही लस घेण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे. यावेळी कोविशील्ड लसीचे लसीकरण ए.एन.एम एस.आर.तबलजी यांनी केले. यावेळी वैद्यकिय अधिकरी डॅा. अरूण गवळी ,अरोग्यसेवक के.एस.पाटील ,भुषण कांबळे, अनिल जाधव ,आरोग्यसेविका नंदा कोरवी, धनराज घाटगे,भैरू कोराणे,नानासो कांबळे,बाजीराव पाटील, ज्ञानदेव पाटील,किरण पाटील, अशोक पाटील ,सिद्राम मांडरेकर आदी उपस्थीत होते.