वृत्तसंस्था/ लीडस्
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचे रविवारी हेडिंग्लेत आगमन झाले असून येत्या बुधवारपासून तिसऱया कसोटीला प्रारंभ होत आहे. रविवारी भारतीय संघाने आपल्या सरावाला प्रारंभ केला.
पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिली कसोटी अनिर्णित राहिली त्यानंतर लॉर्ड्सच्या दुसऱया कसोटीत भारताने यजमान इंग्लंडचा अधिक धावांच्या फरकाने पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. लॉर्ड्सच्या दुसऱया कसोटीत बऱयाच वेळा दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दीक चकमकी झाल्या होत्या. इंग्लंडचा क्रिकेट संघ येथे रविवारी उशीरा दाखल होणार आहे. या तिसऱया कसोटीसाठी डेव्हिड मलानला तसेच सकीब मेहमूदला इंग्लंड संघात संधी देण्यात आली आहे.