आयपीओत पैसा लावण्यात गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र पुढे- चालू आर्थिक वर्षातील चित्र
मुंबई
चालू आर्थिक वर्षामध्ये आयपीओच्या मदतीने ज्या गुंतवणूकदारांचे समभाग विक्री झाले आहेत, त्यामधील जवळपास 52 टक्के गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या दिवशी व 20 टक्के गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या एक आठवडय़ाच्या दरम्यान समभाग विकले आहेत, अशी माहिती ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या एक अहवालामधून दिली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात 5.7 लाख रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओ सबस्क्राईब केले आहेत. ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षात आयपीओसाठी 5.1 लाख प्रस्ताव सादर करण्यात आले होते. इतकेच नाही, तर मागील वर्षात एकूण 36 आयपीओ आले होते. चालू वर्षातील चार महिन्यात 17 आयपीओ आलेले आहेत. यातील एकूण आयपीओच्या एक तृतियांश गुंतवणूक ही गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या ठिकाणाहून करण्यात आली आहे.
52 टक्के गुंतवणूकदारांची स्थिती
गुंतवणुकीच्या बाबतीत पाहता एकंदर आयपीओमधील 64 टक्के गुंतवणूकदार असे आहेत, की ज्यांनी कमीत कमी 2 आयपीओसाठी प्रस्ताव दिले होते. तसेच जवळपास 52 टक्के गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या दरम्यान आपले समभाग विकले आहेत.
डिसेंबरपर्यंत 10 मोठे आयपीओ?
2021 मधील अन्य महिन्यांमध्ये जवळपास 10 मोठय़ा कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. यामध्ये नायका, बजाज एनर्जी, आदित्य बिर्ला, सन लाईफ, एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स आणि गोफर्स्ट(जुने नाव गोएअर)याचा समावेश आहे.